Crime | 50 हजाराची लाच घेताना सहायक निबंधक ACBच्या जाळ्यात; 3 दिवसांची पोलीस कोठडी

नगर – एका सुनावणीत बाजूने निकाल दिल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून 50 हजारांची लाच स्वीकारल्याच्या आरोपीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहायक निबंधकाला अटक करण्यात केली. त्याला आज न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.

सुदाम लक्ष्मण रोकडे (वय 52, रा. सहायक निबंधक वर्ग दोन, सहकारी संस्था, नगर) असे आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी, की तक्रारदार यांनी एका पतसंस्थेकडून 2014 मध्ये सोने तारण ठेऊन तीस लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. संबंधित प्रकरणामध्ये पतसंस्थेने तक्रारदाराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

तक्रादारांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पतसंस्थेचे कर्जाची सर्व रक्कम भरली असताना पतसंस्थेने तक्रादाराविरुद्ध सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्याकडे कलम 101 नुसार वसुली कारवाईसाठी प्रकरण दाखल केले. या प्रकरणामध्ये सहायक निबंधक सुदाम रोकडे यांनी तक्रारदार यांच्या बाजूने निकाल दिला.

त्या निकालाच्या मोबदल्यात आरोपीने तक्रारदाराकडे 15 एप्रिल 2021 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान एक लाखांची मागणी केली. तडजोडीअंती 50 हजार लाचेची पंचासमक्ष मागणी केली. लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता. 15) रोजी कायनेटिक चौक येथील हॉटेल जस्ट ईन ऍव्हेन्यूमध्ये सापळा लावून 50 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी आरोपी सुदाम रोकडे याला आज न्यायालयात केले. गुन्ह्याच्या सखोल तपासाकामी पाच दिवस पोलीस कोठडी देण्याची न्यायालयाला विनंती करण्यात आली. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेऊन आरोपी रोकडे याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार यांनी बाजू मांडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.