सातारा – वडूज पोलीस ठाण्यात नेमणुकीला असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी विभुते यांना निलंबित केल्याचा आदेश पोलीस अधीक्षक कार्यालयाने नुकताच काढला आहेत. याबाबत माहिती अशी, शिवाजी विभुते हे सहा महिन्यांपासून वडूज पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकपदावर आहेत. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात आहे.
पंधरा दिवसांपूर्वी साप्ताहिक सुट्टी असल्याने विभुते गावी गेले होते. गावावरून परत येताना त्यांच्या भरधाव कारने पाच जणांना ठोकरले होते. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर विभुते यांनी जखमींना मदत करणे गरजेचे असतानाही ते तेथून पळून गेले होते.