भाजीविक्रेत्यांकडून लाच घेताना सहायक फौजदार रंगेहाथ

19 ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडी; 4 हजार रुपयांची मागणी

पुणे – दाखल गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी भाजीविक्रेत्यांकडून 4 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केलेल्या सहायक पोलीस फौजदाराला 19 ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.

याप्रकरणी निवृत्ती सदाशिव चव्हाण (वय 56) याला अटक केली आहे. त्याच्याकडे अधिक तपास करण्यासाठी त्याची पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्‍त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी कोर्टात केली.

चव्हाणने एका भाजीविक्रेत्या विरुद्ध दाखल तक्रारीत त्याला अटक होऊ नये म्हणून लाच मागितली होती. 4 हजार रुपयांची लाच घेताना चव्हाणला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

संबंधित भाजीविक्रेत्याने उधारीवर दिलेल्या भाजीचे पैसे मागितले म्हणून त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली होती. त्यात कलम वाढ होऊन त्याला अटक होऊ नये म्हणून चव्हाणने लाचेची मागणी केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.