नगर (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमिवर मनापने सुरु केलेल्या विलगीकरण कक्षासाठी “आमी’ संघटना व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब अहमदनगर मिडटाऊन संस्थांच्या वतीने 100 बेडचे साहित्याची मदत बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात सुपूर्द केले.
यावेळी रोटरी’ चे अध्यक्ष डॉ. प्रदीप चोभे व आमी चे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी मनापा उपायुक्त सुनील पवार यावेळी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने करोना प्रतिबंधक उपाययोजनांची चांगली अंमलबजावणी करत असल्याने नगर मध्ये करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. परंतु येणाऱ्या काळात पर राज्यातून व जिल्ह्यातून नगरमध्ये हजारो नागरिक येणार आहेत. या सर्व नागरिकांना विलागिकरण करण्यासाठी आणि भविष्यात करोना बाधितांची रुग्ण वाढल्यास त्यासाठी महापालिकेच्या वतीने विलागीकरण कक्ष आणि एम्स हॉस्पिटल येथे देडिकेटेड कोविड सेंटर उभारण्यात येत आहे.
या दोन्ही सेंटर्स साठी भरपूर साहित्यांची गरज आहे. ही गरज ओळखून आमी आणि रोटरी मिडटाऊन या दोन्ही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन महापालिकेला उच्च दर्जाचे 100 बेडचे साहित्य पुरवले आहे. यावेळी उपायुक्त पवार म्हणाले, प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी साठी जनताही सहकार्य करत आहे. मनपाच्या या कार्याला अजून बरीच सुविधांची गरज आहे.