नवी दिल्ली: झारखंडमधील विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. झारखंडमध्ये ३० नोव्हेंबरपासून ५ टप्प्यात मतदान होणार आहे.
झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ३० नोव्हेंबरला मतदान होईल. दुसर्या टप्प्यात ७ डिसेंबर रोजी मतदान होईल. तिसर्या टप्प्यात १२ डिसेंबर रोजी मतदान होईल. आणि चौथ्या टप्प्यात १६ डिसेंबर रोजी मतदान होईल तर पाचव्या टप्प्यात २० डिसेंबरला मतदान होईल.
झारखंडमध्ये आजपासून आदर्श आचारसंहिताही लागू करण्यात आली असून या निवडणुकांचे निकाल २३ डिसेंबर रोजी लागतील.
झारखंड विधानसभेची मुदत ५ जानेवारी २०२० रोजी पूर्ण होत आहे, त्याआधी नवीन सरकार स्थापन करण्यात येईल. मागील वेळी झारखंडमध्ये पाच टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या. ८१ सदस्यीय विधानसभेत भाजपा ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन आघाडीने ४२ जागा जिंकल्या होत्या. भाजपने ७२ जागा लढवल्या आणि ३७ जागा जिंकल्या. तर त्याचा सहयोगी पक्ष आजसूने ८ जागा लढवल्या आणि ५ जागा जिंकल्या.