विधानसभा निवडणूक : शासकीय कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार मेहरबान

सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री सर्व स्तरातील लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळत आहे. निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटीला आले होते. यावेळी अनेक दिवसांपासून लटकलेल्या मागण्यांविषयी मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली. यावर अनपेक्षितपणे मुख्यमंत्र्यांनी 60 वर्षे हे सेवानिवृत्तीच वय करण्याबाबत पुढच्याच महिन्यात निर्णय घेणार असल्याचे त्यांना आश्वासन दिले. एवढेच नाहीतर या वर्षाच्या अखेरीसपर्यंत पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल आहे.

मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ यांच्या बैठकीत दोन महत्वाचे निर्णय घेतल्या जातील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल होते. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता निवृत्ती वेतन धारकांनाही आता महागाई भत्त्यात वाढ करण्याचा अध्यादेश आज लागू झालेला आहे. जानेवारी 2019 पासून थकबाकीसह भत्तावाढीची रक्कम मिळणार आहे. साधारण तीन टक्‍क्‍यांनी ही वाढ लागू होणार आहे. सुमारे सात लाख निवृत्तीधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.