नवी दिल्ली : देशातील महत्वाच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकालाचे कल पुढे येत आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल.
दरम्यान, निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी इंफाळमधील श्री गोविंदाजी मंदिरात प्रार्थना केली. तर दुसरीकडे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्री दत्त मंदिरात प्रार्थना केली.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी आपल्या कुटुंबासह चमकौर साहिब गुरुद्वारामध्ये प्रार्थना केली. आणि आप नेते भगवंत मान यांनी संगरूर येथील गुरुद्वारा गुरसागर मस्तुआना साहिबला भेट दिली.