नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांपासूनच आम आदमी पक्षाने चमत्कार केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे निवडणुकींच्या कलांनुसार, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल्याचे निश्चितच झाले. आपने जवळपास 90 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. यावर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीतील कामगिरीमुळे आपचा पंजाबमध्ये विजय मिळाला आहे असे पवार म्हणाले. दिल्लीतल्या कामगिरीमुळे पंजाबचा आपमध्ये विजय झाला आहे. दिल्लीत दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबने आपला स्वीकारले असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाबमधील बहुतांश शेतकरी दिल्लीत होते याचा परिणाम निवडणुकीत पहायला मिळाल्याचंही शरद पवार म्हणाले. लोकांनी दिलेल्या कौलाचा आदर केला पाहिजे असेही शरद पवार म्हणाले आहेत. सर्व विरोधक चर्चा करुन भाजपाला पर्याय देण्याबाबत चर्चा करु असे शरद पवारांनी यावेळी सांगितले.
दिल्लीत दिलेल्या सुविधांमुळेच पंजाबमध्ये आपला स्वीकारले. पंजाब वगळता इतर राज्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांना कौल मिळाला आहे. दरम्यान दिल्लीतील माझ्या बंगल्यातील कर्मचा-यांनीही ‘आप’ला मतं दिली होती. पंजाबच्या शेतक-यांत केंद्र सरकारविषयी राग होता. 5 पैकी 4 राज्यात भाजपचं राज्य होतं. पंजाबमध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. तिथला बदल भाजपला अनुकूल नाही. हा बदल काँग्रेसला झटका देणारा आहे.
काँग्रेसची स्थिती पंजबामध्ये चांगली होती. मात्र जे बदल झालं ते जनतेनं नाकारलेत. अमरेंद्रसिंहसारख्या प्रभावशाली नेत्याला दूर करणं काँग्रेसची चूक झाली. दिल्लीत जे आंदोलन झालं त्यात पंजाबचा फार मोठा भाग सहभागी झाला होता. किसान आंदोलनाचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतोय. म्हणून लोकांनी भाजप काँग्रेसला नाकारत ‘आप’ला सत्ता दिली.
पंजाबच्या शेतकऱ्यांत केंद्र सरकारविषयी राग होता. असं पवार म्हणाले. युपीत अखिलेशची चूक अजिबात वाटत नाही, ते एकटा लढलेत तिथे, जी मत त्याला पडलीत त्याचा त्यानं सकारात्मक विचार करावा, ज्यांच्या लोकशाहीवर विश्वास आहे ते माझ्यासारखे लोक या निकालाच स्वीकार करतील. मिनिमम कॉमन प्रोग्रामनुसार पुन्हा कामं सुरू करावी लागतील असे पवार म्हणाले.