मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातून गणेश भोकरे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, ते आता काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना आव्हान देतील. चौथ्या यादीमधून एकूण पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ( Maharashtra Assembly Election 2024)
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चौथी यादी खालीलप्रमाणे…. pic.twitter.com/LP8hBG0JJo
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 25, 2024
आत्तापर्यंत मनसेकडून एकूण 70 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मनसेने चौथ्या यादीतून कसबा पेठ, चिखली, कोल्हापूर उत्तर, केज आणि कलीना या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील कलीना विधानसभेतून शिवसेना ठाकरे गटाचे संजय पोतनीस निवडणूक लढणार आहेत. त्यांच्याविरोधात मनसेने संदीप उर्फ बाळकृष्ण हुटगी यांना उमेदवारी देऊ केली आहे. महायुतीकडून या मतदारसंघात अद्याप कोणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही.