वडगाव मावळ – आढले बुद्रुक (ता. मावळ) येथील भाजपा युवामोर्चा पुणे जिल्हा कार्याध्यक्ष व मावळ तालुका भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. त्यातून ते थोडक्यात बचावले.
ही घटना आढले बुद्रुक येथील त्यांच्या राहत्या घरासमोर शनिवारी (दि. 4) सव्वानऊच्या सुमारास घडली. या संदर्भात बाळासाहेब घोटकुले यांनी शिरगाव पोलीस चौकी येथे रात्री उशिरा फिर्याद दाखल केली आहे.
घोटकुले हे आपल्या घराजवळ रात्री 9.15 च्या सुमारास शतपावली करत असताना चारचाकीमधून आलेल्या 8-9 जणांच्या टोळक्यांनी त्यांना घेरले व डोक्याला रिव्हाल्वर लावून गळ्यातील चार तोळ्यांची चैन व तीन तोळ्यांचे ब्रेस्लेट जबरदस्तीने काढून घेतले. वेळीच आरडाओरड केल्याने मदतीसाठी आलेले बंधू भाऊसाहेब घोटकुले धावून आले. त्यांच्या भावाला किरकोळ मार लागून जखमी झाले. यानंतर हल्लेखोर पसार झाले.