युपीत भाजपच्या स्थानिक नेत्याची हत्या

बागपत – उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्याचे भाजपचे माजी अध्यक्ष आणि तेथील स्थानिक नेते संजय खोकर यांची आज सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ते सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना हा प्रकार घडला, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्‍त केले असून त्यांनी हल्लेखोरांना येत्या 24 तासांत पकडण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे.

पूर्वीच्या शत्रुत्वातून हा प्रकार झाला असावा असा पोलिसांचा कयास आहे. खोकर यांनी तीन वर्षे बागपत जिल्ह्याच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना या पदावरून दूर करण्यात आले होते.

तथापि, ते पक्षाच्या कार्यात सक्रिय होते. पोलिसांना हल्लेखोरांचे वर्णन मिळाले असून त्यांच्या मागावर पोलीस पथके पाठवण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.