बंगळुरू – गावातील ओळखीतून येथील महाविद्यालयात नर्सिंग शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनीवर मित्रानेच बलात्कार करून तिचा खून केला. या 19 वर्षीय युवतीच्या मृत्यूनंतर बारापेटाचे खासदार अब्दुल खलीक यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना पत्र पाठवून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली.
यातील मुख्य आरोपी अनीसूर रहमान याला अटक करण्यात आली आहे. मूळ आसामची असणाऱ्या या युवतीने बंगळुरूतील महाविद्यालयात आरोपीच्या माध्यमातून प्रवेश घेतला होता. ब्यादरहल्ली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची प्राथमिक चौकशी सुरू आहे.