गुवाहाटी – आसामात सध्या निवडणूकांचा कार्यकाळ सुरू असल्याने राज्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार रस्त्यांवरील वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. या तपासणीत आत्ता पर्यंत 2 कोटी 72 लाख रूपयांची रोकड आणि 1 कोटी 10 लाख रूपयांची दारू सापडली आहे.
मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी पैसे व दारू वाटप होऊ नये म्हणून ही तपासणी केली जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी पोलिस व फ्लाईंग स्कॉड तैनात करून वाहनांची तपासणी केली जात आहे.
राज्यात तीन टप्प्यांमध्ये ही निवडणूक होत असून ही प्रक्रिया पुर्ण होई पर्यंत राज्यात वाहनांची ही तपासणी सुरूच राहणार आहे. निवडणूक आचार संहिता काळात निवडणूक सुरू असलेल्या सर्वच राज्यांमध्ये अशा प्रकारची वाहन तपासणी सुरू असते.