पुणे – हॉटेलमध्ये गर्ल फ्रेंडसोबत बसलेल्या तरुणास एकाने त्याचा पगार किती? अशी विचारणा केली. याचा राग मनात येऊन संबंधीत तरुणाने पगार विचारणाऱ्यास मित्रांच्या मदतीने लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना येरवडा येथे शास्त्रीगर चौकात घडली. याप्रकरणी रोहित मोरे(रा.वडगाव), रॉनी अर्कस्वामी , ऍथोनी अर्मस्वामी(दोघे रा.वडगाव शेरी) नानु(रा.ताडीवाला रोड) अशी अटक आरोपींची नावे आहेत
याप्रकरणी निलेश शांताराम देशमुख(28,रा.वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील ऍन्थोनी स्वामी हा त्याच्या गर्ल फ्रेंडसोबत सन सिटी चौकातील हॉटेलमध्ये बसला होता. यावेळी फिर्यादीने त्यास गर्ल फ्रेंडसमोर तुला पगार किती आहे? तु कोठे काम करतोस अशी विचारणा केली. गर्ल फ्रेंडसमोर अशी विचारणा केली गेल्याने अँथोनीस फिर्यादीचा जाम राग आला. त्याने नंतर मित्रांना बोलावून घेऊन फिर्यादीला शास्त्रीनगर चौकात गाठून लोखंडी पाईपने मारहाण केली. यामध्ये फिर्यादीच्या पाठीवर, हातावर आणी पायावर मार लागला. याप्रकरणाचा तपास पोलीस नाईक घावटे करत आहेत.