लोकप्रिय जोडी आसिम रियाज आणि हिमांशी खुरानाचा लेटेस्ट म्युझिक व्हिडीओ “ख्याल रख्या कर’ नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या गाण्यात दोघांची खूपच जबरदस्त केमिस्ट्री दिसून आली आहे. या जोडप्याचे रोमॅंटिक गाणे चाहत्यांमध्ये खूपच व्हायरल होत आहे.
हा पंजाबी ट्रॅक प्रितींदरने गायला आहे. तर बाबू यांचे गीत, तर रजत नागपाल यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन गुरिंदर बावा यांनी केले आहे. आसिम रियाज आणि हिमांशी खुराना यांचे हे दुसरे गाणे आहे. यापूर्वी दोघेही नेहा कक्करच्या “कल्ला सोहना नहीं’ या गाण्यात झळकले होते.
या म्युझिक व्हिडीओमध्ये आसिम रियाज आणि हिमांशी खुरानाची प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. यातील दोघांची केमिस्ट्री खूपच लाजवाब आहे. आसिम रियाज आणि हिमांशी खुराना यांच्या या गाण्याचे शूटिंग पंजाबमध्ये करण्यात आले आहे. यात हिमांशी पंजाबी लूकमध्ये दिसत असून प्रत्येक सीनमध्ये ती खूपच सुंदर दिसते. सोशल मीडियावरही आसिम रियाज आणि हिमांशी खुराना यांच्या केमिस्ट्रीचे कौतुक होत आहे.
दरम्यान, “बिग बॉस 13’मध्ये आसिम आणि हिमांशीची जोडी बनली होती. त्यात दोघांनाही प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला होता. तसेच आसिमने हिमांशीला लग्नासाठी प्रपोज केले. हा शो संपल्यानंतरही त्यांची जोडी कायम आहे.