नवी दिल्ली : रियो आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकला आशियाई कुस्ती स्पर्धेतील अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
.@SakshiMalik won a gallant silver medal at the #AsianWrestlingChampionships in women’s 65 kg. #TOPSAthlete @Phogat_Vinesh won bronze in women’s 53 kg, her 7th medal at this c’ship. Anshu (57 kg) and Gursharanpreet (72 kg) won bronze as well.@KirenRijiju @DGSAI @RijijuOffice pic.twitter.com/ePkYb15mxE
— SAI Media (@Media_SAI) February 21, 2020
दिल्ली येथील खाशाबा जाधव बंदीस्त कुस्ती संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या साक्षी मलिकचा जपानच्या नाओमी रूइके हिने २-१ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.
Asian Championship: Wrestler Sakshi Malik lost to Japan's Naomi Rukie in the 65kg freestyle final; settled for silver. (File pic) pic.twitter.com/XJ4yfcHRZz
— ANI (@ANI) February 21, 2020
दरम्यान, साक्षीने पहिल्या फेरीत कोरियाच्या ओ ह्यूंग हिचा १४-४ असा तर दुस-या फेरीत उज्बेकिस्तानच्या नबीरा हिचा ५-४ असा पराभव करत अागेकूच केली होती.