#AsianWrestlingChampionships : सुनील कुमारने पटकावले सुवर्णपदक

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू सुनील कुमारने मंगळवारी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील ग्रीको-रोमनच्या ८७ किलो वजनी गटात किर्गिस्तानच्या अझात सिलदिनोव्हा यांचा ५-० ने पराभव करत सुवर्णपदकाची कमाई केली.

भारताने तब्बल २७ वर्षांनी या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. याआधी १९९३ मध्ये पप्पू यादवने ४८ किलो वजनी गटात ग्रीको-रोमनमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.

दरम्यान, सुनीलकुमार याने २०१९ मध्येही या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण, त्यावेळी त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.