आशियाई स्पर्धा : पीव्ही सिंधूने घडविला इतिहास, अंतिम फेरीत प्रवेश

संग्रहित छायाचित्र.....

भारताची स्टार महिला एकेरी बॅडमिंटनटू पीव्ही सिंधूने उपांत्यफेरीची लढत जिकंत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्यफेरीच्या सामन्यात जपानच्या अकाणे यामागूची हिचा २१-१७, १५-२१ आणि २१-१० असा तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात पराभव केला. बॅडमिंटन क्रीडाप्रकारात आशियाई स्पर्धेच्या अंतिमफेरीत पोहोचणारी पहिली महिला भारतीय खेळाडू होण्याचा मान पीव्ही सिंधूने पटकावला.

पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी प्रथम संयमाने खेळ केला. त्यानंतर सिंधूने नेहमीप्रमाणे विरोधी खेळाडूला पूर्ण कोर्ट खेळण्यास भाग पडले आणि वेळोवेळी फायदा घेतला. त्याचबरोबर पहिला सेट २१-१७ असा आपल्या नावे केला. दुसर्या सेटमध्ये जपानची खेळाडू भारतीय खेळाडूंपेक्षा वरचढ ठरली आणि तिने दुसरा सेट २१-१५ असा आपल्या नावे केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये पीव्ही सिंधूने मोठ्या रॅलीज खेळण्यावर भर दिला. विरोधी खेळाडू पुर्णपने दडपणाखाली गेली. सिंधूच्या मोठ्या रॅलीजमुळे यामागूची दमछाक होत होती. त्यामुळे ती गुण  घेण्यास कमी पडत होती. सिंधूने हा सेट २१-१० असा सहज जिकंत अंतिम सामन्यात प्रवेश केला. या विजयासह तिने आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)