Asian Games 2023 : भारताने आज आशियाई खेळ 2023 (Asian Games 2023) मध्ये इतिहास रचला आहे. चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताने आतापर्यंत एकूण 100 पदके जिंकली आहेत. या पदकांसोबत भारताने नवा इतिहास रचला आहे. दरम्यान, या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला कबड्डी संघाचे आणि देशवासीयांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासाठी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी,”आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताने मोठी कामगिरी केली आहे. आम्ही १०० पदकांचा टप्पा गाठला याचा भारतातील लोकांना आनंद आहे. या प्रसंगी मी आमच्या खेळाडूंचे मनापासून अभिनंदन करतो ज्यांच्या प्रयत्नांमुळे भारताने हे ऐतिहासिक यश मिळवले आहे. त्याच्या चमकदार कामगिरीमुळेच आज आपल्याला अभिमान वाटतो.” असे म्हणत खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
A momentous achievement for India at the Asian Games!
The people of India are thrilled that we have reached a remarkable milestone of 100 medals.
I extend my heartfelt congratulations to our phenomenal athletes whose efforts have led to this historic milestone for India.… pic.twitter.com/CucQ41gYnA
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2023
आशियाई खेळ 2023 (Asian Games 2023) मध्ये भारतीय खेळाडूंनी 100 पदके जिंकून इतिहास रचला आहे. टीम इंडियाने एकूण 25 सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यासाठी खेळाडूंनी शनिवारी सकाळी तिरंदाजीत दोन सुवर्णपदके जिंकली. भारतीय महिला कबड्डी संघाचे हे तिसरे विजेतेपद आहे.
गेल्या वेळी त्याने जकार्ता येथे रौप्यपदक जिंकले होते. अंतिम सामन्यात चायनीज तैपेई संघाने अतिशय कडवे आव्हान दिले, पण भारताला एका गुणाने पराभव पत्करावा लागला. पदकतालिकेत भारत सध्या चौथ्या स्थानावर आहे. या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. चीनने 356 पदके जिंकली आहेत.