अमित पांघल आणि पुजा राणी यांना सुवर्णपदक

नवी दिल्ली  – भारताचे बॉक्‍सर अमित पंघल आणि पुजा राणी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभवाची धुळ चारत आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अमितने 52 किलो वजनी गटात कोरियाच्या किम इंक्‍यूवर मात केली. तर महिलांमध्ये पुजा राणीने 81 किलो वजनी गटात वॅंग लिनावर मात केली. 49 किलो वजनी गटातून 52 किलो वजनी गटात सामने खेळायला लागल्यानंतर अमितचे या स्पर्धेतल सलग दुसऱ्या वर्षातलं सुवर्णपदक ठरले आहे.
यावेळी अमितने सामन्याच्या सुरुवातीपासून आपले वर्चस्व कायम राखले होते. आक्रमण आणि बचावाचा सुरेख मिलाप करुन खेळ केल्याने या सामन्यात प्रतिस्पर्धी किमला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही.

तर, पुजा राणीने 81 किलो वजनी गटात वॅंगचा सहज पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. यावेळी पुजाने सामन्याच्या सुरूवातीपासून वर्चस्व गाजवले. त्यामुळे वॅंगला सामन्यात पुनरागमनाची कोणतीही संधी मिलाली नाही आणि तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर, पुजाने उत्कृष्ठ कामगिरीच्या बळावर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
सामना संपल्यानंतर अमितने आपल्या खेळाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, मी ज्या पद्धतीने रणनिती आखली होती, त्याप्रमाणे खेळ केला आणि सामना जिंकला. याचा मला आनंद आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.