आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्‍यपद स्पर्धा – भारताचे आव्हान संपुष्टात

हॉंगकॉंग -आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्‍यपद स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान चायनीज तैपेईने संपुष्टात आणले. 2-3 अशा फरकाने भारताला पराभव पत्करावा लागला.

अश्‍मिता चलिहा आणि पुरुष दुहेरीतील जोडी अरुण जॉर्ज व सन्याम शुक्‍ला यांनी त्यांचे प्रारंभीचे सामने जिंकून घेत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर, तिन्ही सामन्यात तैपेईचे बॅडमिंटनपटू वरचढ ठरले. वॅंग झू वेईने सौरभ वर्माला, महिलांच्या दुहेरीत शिखा गौतम व आरती सारा तर मिश्र दुहेरीत सारा व रुतपर्णा पांडा यांना पराभुत करत तैपेईने सामना जिंकला.

Leave A Reply

Your email address will not be published.