मस्कत – भारतीय हॉकी संघाला आशिया करंडक हॉकी स्पर्धेत पहिल्याच सामन्यात जपान कडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला.
गत विजेत्या भारतीय संघाचा अ गटातील लढतीत पहिलाच ठरला. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला नागा युरी हिने जपानचे खाते उघडले आणि नंतर ४२व्या मिनिटाला त्यांच्या साकी तनाका हिने दुसरा गोल केला
जपानची आक्रमक सुरवात आणि त्याला संथ प्रत्युत्तर भारताला चांगलेच महागात पडले. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला जपानने गोल केला. सामन्यात स्थिरावण्याचा प्रयत्न करत असतानाच जपानच्या या आघाताने भारतीय महिलांनी दडपण घेतले. पण, त्यांनी कच खाल्ली नाही. सामन्यावर नियंत्रण राखण्याचा त्यांनी जरुर प्रयत्न केला. त्यांनी पंधरा मिनिटात दोन कॉर्नरही मिळविले. पण, ते व्यर्थ ठरले. जपानच्या कॉर्नरचा भारतीयांनी सुरेख बचाव केला. मध्यंतराला सामना जपानच्या १-० अशा आघाडीवर थांबला होता.
अ गटात आता जपान दोन विजयासह आघाडीवर आहे. भारत मलेशियावरील विजयाने दुसऱ्या स्थानावर आहे. जपानने पहिल्या सामन्यात सिंगापूरचा पराभव केला आहे. भारताची गाठ आता उद्या सिंगापूरशी पडणार आहे. गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.