Emerging Teams Asia Cup 2024 (IND-A vs AFG-A,SemiFinal) : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पुरुष टी-20 इमर्जिंग टीम एशिया कप 2024 चा दुसरा उपांत्य सामना अल अमिरातीमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 4 गडी गमावून 206 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी 207 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या डावात अफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. अकबारीने 33 चेंडूत तर अटलने 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अकबरी आणि अटल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी झाली. अकबरीने या सामन्यात 41 चेंडूत (5 चौकार आणि 4 षटकार) 64 धावांची खेळी केली आणि नंतर तो बाद झाला.
Afghanistan Post 206/4 Runs on the Board 🎯
After opting to bat first, #AfghanAbdalayan posted 206/4 runs on the board in the 1st inning, with major contributions coming in from Sediqullah Atal (83) scored his 4th half-century whereas Zubaid Akbari (64) and Karim Janat (41). 👏 pic.twitter.com/PGj2jDFUch
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 25, 2024
त्यानंतरही सेदिकुल्लाह अटल याने वादळी खेळी सुरुच ठेवली. अटलने 52 चेंडूत 83 धावांची खेळी केली. त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले. त्यामुळे अफगाणिस्तानची धावसंख्या 180 पार गेली. त्यानंतर दरविश रसूली पुढच्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर करीम जनातने मोर्चा सांभाळला. त्यानं 20 चेंडूत तुफान फटकेबाजी करत 41 धावा केल्या.
उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने भारतीय गोलंदाजांची पिसं काढली. अफगाणिस्तान फलंदाजासमोर भारतीय गोलंदाज फक्त हतबल दिसत होते. भारताकडून रसिख दार सलामने सर्वाधिक 3, तर अकिब खानने एक विकेट घेतली. राहुल चाहर सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्यानं 3 षटकात 48 धावा दिल्या तर अंशुल कंबोजनेही 3 षटकात 40 धावा दिल्या.