शाकिब अल हसन ‘या’ कारणांमुळे फायनलच्या आधीच स्वदेशी रवाना

अबुधाबी – आशिया चषक 2018 मध्ये शुक्रवारी होणाऱ्या भारताविरूध्दच्या सामन्यापूर्वीच बांगलादेशला मोठा झटका लागला आहे. बांगलादेशचा अनुभवी, अष्टपैलू खेळाडू शाकिब-अल-हसन दुखापतीमुळे बांगलादेशात परतला आहे. तस पाहता शाकिब हा या स्पर्धेत संघ व्यवस्थापनच्या अपेक्षानुसार चांगली कामगिरी करू शकला नाही.

शाकिबने 4 सामन्यात 12.25 च्या सरासरीनुसार 49 धावा केल्या आहेत. तसेच त्याने स्पर्धेत 37.4 षटके टाकून 7 विकेट घेतल्या आहेत, पण जेव्हा जेव्हा संघाला त्याची आवश्यकता होती, तेव्हा शाकिब चांगली कामगिरी करू शकला नाही. शाकिब बुधवारी पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यात खेळला नव्हता. माहितीनुसार संघाने शाकिबला बुधवारी झालेल्या पाकिस्तानच्या विरूध्दातील सामन्यात खेळविण्यासाठी खूप प्रयत्न केले पण बोटाची दुखापत आणि दुखणे वाढल्याने तो सामन्यात खेळू शकला नाही आणि त्याला स्वदेशी म्हणजेच बांगलादेशात परत जावे लागले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान बांगलादेश संघ व्यवस्थापन शाकिबच्या खराब कामगिरीमुळे निराश होते. तसेच स्वत: शाकिब सुध्दा त्याच्या कामगिरीवर निराश होता. या कारणामुळे आणि दुखापतीमुळे क्रिकेट बोर्डने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला.

पण उद्या होणाऱ्या भारताविरूध्दच्या आशिया चषकाच्या अंतिम लढतीत अनुभवी खेळाडू नसल्याने बांगलादेशला महागात पडू शकते. शेवटी क्रिकेटमध्ये महत्वाच्या सामन्यात अनुभव हा खूप महत्वाचा असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)