मनिला – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने आशिया करंडक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला. आता तिचे ब्रॉंझपदक निश्चित झाले असून उपांत्य फेरीत विजय मिळवत अंतिम फेरीत दाखल झाली तर तिला रजत किंवा सुवर्णपदकाचीही संधी राहणार आहे.
सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत शुक्रवारी चीनची मानांकित खेळाडू हे बिंग जियाओवर तब्बल 1 तास 16 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-9, 13-21 व 21-19 अशी तीन गेममध्ये मात केली. हा सामना दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना दिलेल्या लढतीमुळे जास्त रंगला. यंदाच्या मोसमात जियाओविरुद्धच्या दोन्ही लढती सिंधूने जिंकत आपले वर्चस्व यापूर्वीच सिद्ध केले होते, आजही तिने त्याच जोशात खेळ केला.