पुणे : केंद्रीय माहीती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज भारतीय फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटमधील प्रेक्षागृहाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर खुल्या व्यासपीठावर विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्र्यांनी जागतिक स्तरावर एफटीआयआयला आणखी पुढे नेण्याचे त्यांचे दृष्टिकोन स्पष्ट केले.
आपला वारसा आणि संस्कृती पुढील उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी एक मजबूत पाया उपलब्ध करून देतो असे ते म्हणाले, वैष्णव यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांकडून विविध प्रश्नांची उत्तरे दिली आणि प्रस्तावित मानलेल्या विद्यापीठाच्या दर्जाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. देशातील चित्रपट शिक्षणासाठी आपले दृष्टिकोन वैष्णव यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या संधी बळकट करण्यावर, उद्योगाशी अधिक चांगले संबंध निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. अल्पावधीतच जागतिक खेळाडूंसाठी एक प्रमुख प्रतिभा प्रदाता बनलेल्या गति शक्ती विश्वविद्यालयाचे उदाहरण त्यांनी दिले.
नवीन सभागृह केवळ एफटीआयआयच्या अध्यापनशास्त्रासाठी एक अमूल्य क्षमता ठरणार नाही तर पुण्याच्या समृद्ध सांस्कृतिक आकाशात एक महत्त्वाची उपस्थिती असेल, अशा शब्दात वैष्णव यांनी नवीन सभागृहाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमाचा एक भाग म्हणून वैष्णव यांनी संस्थेच्या विविध भागांना भेट दिली आणि प्राध्यापकांशी संवाद साधला. त्यांनी सर्जनशील अर्थव्यवस्थेबद्दल आपले विचार व्यक्त केले आणि एफटीआयआयच्या प्रतिभा आणि परिसंस्थेसह आपण एक मोठे खेळाडू बनू शकतो असे नमूद केले.
रिमोट कंट्रोलद्वारे हलवता येणारा स्क्रीन
586 आसन क्षमता असलेल्या या सभागृहात सिनेमा प्रोजेक्टर, स्टेज परफॉर्मन्ससाठी पीए सिस्टम आणि अत्याधुनिक डॉल्बी अॅटमॉस सराउंड साउंड सिस्टम अशा सर्व आधुनिक सुविधा आहेत. सभागृहाच्या सर्वात विशिष्ट वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याची नाविन्यपूर्ण आडवे हलवता येणारी ५० फूट रुंद आणि २० फूट उंच स्क्रीन हे आहे. ही अत्याधुनिक स्क्रीन रिमोट कंट्रोल वापरून सहजतेने हलवता येते. त्यामुळे सभागृहाचे सिनेमा थिएटरमध्ये रूपांतर होते.