उपमुख्यमंत्री अजित पवार : करोना कार्य अहवालाचे प्रकाशन
पुणे – माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांच्या करोनाकाळातील कार्य अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. उपमुख्यमंत्री पवार यांनी कदम यांच्या कामाचे कौतुक करत हे काम करताना आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील राहील, असे आश्वासन दिले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, कामगार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
दरम्यान, कदम यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत मतदारसंघातील आरोग्यविषयक प्रश्नांसंदर्भात पुण्यात आल्यानंतर भेट देण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री टोपे यांनीही कदम यांना दिले.