लंडन -भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेस 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सीझनला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी फ्रेश होण्यासाठी भारतीय खेळाडूंना ब्रेक देण्यात आला आहे.
भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विनने या ब्रेकमध्येही नवी योजना आखली आहे. जर अश्विनला इंग्लंडमध्ये वर्क व्हिसा मिळाल्यास तो काउंटी क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे.
अश्विन हा सरे या काउंटी संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी झाल्यास 11 जुलै रोजी सुरू होणाऱ्या फर्स्ट क्लास मॅचमध्ये अश्विन मैदानात उतरणार आहे.
“द ओव्हल’वर हा सामना खेळवण्यात येणार आहे. याच मैदानामध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि शेवटची टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे अश्विनला सरेकडून खेळण्याची संधी मिळाल्यास त्याला फायदेशीर ठरणार आहे.