आश्विन ठरला दशकातील सर्वोत्तम गोलंदाज

दुबई : भारतीय संघाचा फिरकीपटू रवीचंद्रन आश्विनने यंदाच्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून सर्वाधिक विकेट घेणा-या खेळाडूंच्या यादीत अग्रस्थान पटकावले आहे. ३३ वर्षीय अाश्विनने या दशकामध्ये तिन्ही प्रकारात मिळून एकूण ५६४ विकेट घेतल्या आहेत. आयसीसीने ट्विटरव्दारे ही माहिती जाहीर केली आहे.

आश्विनने कसोटीमध्ये २५.३६ च्या सरासरीने ३६२, एकदिवसीय सामन्यात ३२.१९ च्या सरासरीने १५० तर टी-२० मध्ये ५२ विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे दशकातील सर्वोत्तम गोलंदाज ठरल्यानंतरही त्याला जुलै २०१७ पासून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.

दशकात सर्वाधिक बळी मिळवणारे टाॅप ५ गोलंदाज :

१)रविचंद्रन आश्विन (भारत) : ५६४

२) जेम्स अँडरसन (इंग्लंड) : ५३५

३) स्टुअर्ट ब्राॅड (इंग्लंड) : ५२५

४) टिम साउदी (न्यूझीलंड) : ४७२

५) ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) : ४५८

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.