Ashwin favours DRS in Domestic Cricket – भारताचा फिरकीपटू असलेल्या रविचंद्रन अश्विनने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सध्या सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये निर्णय पुनरावलोकन प्रणाली (डीआरएस) लागू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यापूर्वी युवा फलंदाजांना आवश्यक असलेला तांत्रिक बदल करण्यास डीआरएस प्रणालीची मदत होणार असल्याचे अश्विनने सांगितले.
शुक्रवारी संध्याकाळी अनंतपूर येथे खेळल्या जात असलेल्या दुलीप ट्रॉफी सामन्यात भारत-ड संघाचा फलंदाज रिकी भुईला पायचीत देण्यात आले होते. मैदानावरील अंपायरने फलंदाजाला आऊट दिले नाही पण इंडिया सी ने डीआरएसचा अवलंब केला ज्यानंतर भुईला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. या संदर्भात बोलताना त्याने प्रतिक्रिया दिली.
अश्विनने ट्विटरवर लिहिले की, ‘देशांतर्गत क्रिकेटसाठी डीआरएस केवळ योग्य निर्णय घेण्यापुरते मर्यादित नाही. मानव सुथारच्या गोलंदाजीवर शुक्रवारी संध्याकाळी रिकी भुवी (भुई)ला बाद करणे ही महत्वाची बाब होती. बीसीसीआयने डीआरएस लागू केल्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ही तंत्रे नसती तर फलंदाज बाद होण्यापासून वाचले असते.’
Duleep Trophy 2024 : ऋतुराज ठरला श्रेयसवर भारी; भारत ‘क’ संघाचा ‘ड’ संघावर दणदणीत विजय…
अश्विन म्हणाला, जुन्या काळी फ्रंटफूटवर खेळताना चेंडू पायावर आढळल्यास बहुतांश वेळी फलंदाजाला नाबाद ठरविले जात होते. मात्र, डीआरएसनंतर यामध्ये मोठा बदल झाला आहे. त्यामुळे फ्रंटफूटवर खेळणारा खेळाडूला देखील बाद करण्यात येऊ शकते. त्याचा मोठा परिणाम जाणवत असल्याचे आहे. मैदानावरील पंचाचा निर्णय बदलण्यासाठी आता गोलंदाजांना डीआरएसचा पाठिंबा आहे, त्यामुळे फलंदाजांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांच्या तंत्रात आवश्यक बदल करावे लागतील, असे अश्विनचे मत आहे.