GT vs DC Ashutosh Sharma and Ishant Sharma Clash IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील ३४ वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना गुजरातसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाजी आशुतोश शर्मा आणि गुजरात टायटन्सचा गोलंदाज इशांत शर्मा यांच्यात जोरदार वादावादी झाली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘या’ मुद्द्यावरून दोघात झाले भांडण –
ही घटना दिल्लीच्या डावाच्या १९ व्या षटकात घडली. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इशांतने फलंदाज डोवोवन फरेराला बाद केले. त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आशुतोष शर्माविरुद्ध कॅच आऊटची अपील करण्यात आले, पण पंचांनी नॉट आऊट घोषित केले. यावेळी गुजरातचे सर्व रिव्ह्यू संपल्यामुळे त्यांना डीआरएस घेता आले नाही. अशा परिस्थितीत, इशांतला त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो थेट आशुतोषकडे गेला आणि त्याच्याकडे बोट दाखवत रागाने काहीतरी बोलू लागला.
रिप्लेमध्ये सत्य आले बाहेर –
Battle b/w ishant sharma vs ashutosh Sharma 🤣 pic.twitter.com/EMd12Z2o7V
— Daigo18 (@daigo2637391027) April 19, 2025
मात्र, या दरम्यान आशुतोषने आपला संयम गमावला नाही आणि वरिष्ठ खेळाडूचा आदर करत शांत राहिला. तो इशांतला दाखवत राहिला की चेंडू त्याच्या बॅटला लागला नाही, तर त्याच्या खांद्याला लागला आणि तो यष्टीरक्षकाकडे गेला. दिलासा देणारी गोष्ट अशी होती की हे प्रकरण जास्त काळ टिकले नाही आणि इशांत लगेच बाहेर गेला. यानंतर, रिप्लेमध्येही स्पष्ट झाले की आशुतोष खरे बोलत होता आणि चेंडू त्याच्या खांद्यावर लागला होता. यानंतर, २० व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर आशुतोष बाद झाला, पण तोपर्यंत त्याने १९ चेंडूत ३७ धावा केल्या होत्या आणि संघाला २०० धावांच्या जवळ नेले होते.
हेही वाचा – GT vs DC : केएल राहुलने सॅमसन-धोनीला मागे टाकत रचला इतिहास! नोंदवला ‘हा’ खास विक्रम
सामन्याबद्दल बोलायचे, तर गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीने २० षटकांत ८ गडी गमावून २०३ धावा केल्या. दिल्लीने सामन्यासाठी जॅक फ्रेझर मॅकगर्कचा समावेश केला नाही आणि करुण नायर अभिषेक पोरेलसह डावाची सुरुवात करण्यासाठी आला. अभिषेकने संघाला चांगली सुरुवात दिली, पण अर्शद खानने पोरेलला आऊट केले. अभिषेक आऊट होण्यापूर्वी ९ चेंडूत १८ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.