पुणे – संकष्टी चतुर्थीला नागरिक देवदर्शनाला जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातील तीन आगारांतून प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीस अष्टविनायक दर्शन मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, तळेगाव आगारांतून प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीस अष्टविनायक दर्शन मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
जानेवारीच्या चतुर्थीसाठी धावणाऱ्या विशेष गाडीचे आरक्षण सुरू आहे. या बसेस थेऊर, मोरगाव, सिद्धेश्वर, रांजणगाव दर्शन करून ओझर येथे मुक्कामी राहतील. मात्र, मुक्काम आणि जेवणाचा खर्च प्रवाशांना करावा लागणार आहे.
यासह प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक सुट्टीच्या कालावधीत शिवाजीनगर आगारातून 11 मारुती दर्शन ही बस धावणार असून, ही गाडी 23 जानेवारी रोजी शिवाजीनगर येथून सुटणार आहे.