#HBD : विनोदाचा सम्राट ‘अशोक सराफ’

विनोदाचा सम्राट ‘अशोक सराफ’ यांचा आज म्हणेजच ४ जूनला वाढदिवस आहे. अशोक सराफ यांनी मराठी प्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीत देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. अशोक सराफ यांना संपूर्ण चित्रपटसृष्टीत ‘अशोक मामा’ म्हणून देखील ओळखले जाते. अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ साली बेळगाव येथे झाला. पण त्यांचं बालपण दक्षिण मुंबईतल्या चिखलवाडीत गेलं आहे. आणि शालेय शिक्षण मुंबईतील डिजीटी विद्यालयात झाले आहे.

अशोक सराफ यांनी १९६९ साली ‘जानकी’ या चित्रपटात भूमिका करून मराठी चित्रपटसृष्टीत आपलं पाऊल टाकलं. त्यानंतर त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. पत्नी निवेदिता सराफ आणि मुलगा अनिकेत असं अशोक सराफ यांच छोटं कुटुंब आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.