न्हावरे: शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचा भल्याभल्यांचा अंदाज चुकवत सर्वसामान्य जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अँड.अशोक पवार यांना ४१ हजार ५०४ मतांच्या मताधिक्याने विजयी केले.
पवार यांनी भाजपचे पाचर्णे यांचा पराभव केला आहे. २०१४ च्या निवडणुकीत पाचर्णे यांनी भाजपात प्रवेश करत त्यावेळचे विद्यमान आमदार अशोक पवार यांना पराभूत केले होते. मात्र यावेळी पवार यांनी ४१ हजारहून अधिक मताधिक्य घेत आपल्या पराभवाची सव्याज परतफेड केली आहे. आपल्या विजया संदर्भात प्रतिक्रिया देताना अशोक पवार यांनी जनतेचे आभार मानले आहेत.