शिरुर : शिरूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आपल्या प्रचार दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी पुणे मनपाचे विद्यमान नगरसेवक शांताराम कटके, यांच्यासह ग्रामस्थ, विविध कार्यकारी सोसायटीचे आजी माजी सदस्य, माजी सरपंच, माजी उपसरपंच, ज्येष्ठ नागरिक, आदी मान्यवर उपस्थित होते.
अशोक पवार यांच्या विनंतीवरून शांताराम कटके यांनी उमेदवारी तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करून अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला व अशोक पवार यांना जाहीर पाठिंवा दर्शविलाल्याबद्दल आमदार अशोक पवार यांनी शांताराम कटके यांचे आभार व्यक्त केले. शांताराम कटके यांचा शिरूर मतदारसंघात जनतेशी दांडगा जनसंपर्क असल्याने निश्चितच अशोक पवार यांना फायदा नक्की होणार आहे.
वढू बुद्रुक येथून सकाळी आठ वाजता संभाजी महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आमदार अशोक पवार यांनी सर्व सहकार्यासमवेत प्रचाराला सुरुवात करून वढू बुद्रुक, कोरेगाव भिमा,वाडा पुनर्वसन, आपटी, वाजेवाडी, पिंपळे जगताप, डिंग्रजवाडी, धानोरे, दरेकरवाडी, शिक्रापूर, कोंढापुरी, भांबडे, कळवंतवाडी, आंबळे या गावांचा गाव भेट दौरा दिवसभरात करून प्रत्येक गावात प्रचार सभा घेत ग्रामस्थांशी संवाद साधला ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करीत अशोक पवार यांचे स्वागत करण्यात आले असून जनतेकडून त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.