शिक्रापूर : पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे शिक्रापूर चाकण रस्त्यावर 6 जानेवारी रोजी शाळेमध्ये मुलाला सोडायला चाललेल्या गणेश खेडकरसह त्याच्या दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने शिरुर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी सदर कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले आहे.
पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे 6 जानेवारी रोजी घडलेल्या अपघातात गणेश खेडकर सह त्याच्या दोन बालकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरत रस्त्याच्या सुधारणेसाठी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. नुकतेच माजी आमदार अशोक पवार यांनी खेडकर कुटुंबियांची भेट घेतली.
यावेळी बाजार सामीचे माजी सभापती शंकर जांभळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, सरचिटणीस ज्ञानेश्वर थेऊरकर, चंदन सोंडेकर, सागर गव्हाणे, स्वप्नील शेळके, माजी सरपंच निलेश जगताप, शिवाजी जगताप, सुंदरलाल दौंडकर, संदीप जगताप, गणेश शेळके, मोहन भुजबळ यांसह आदी उपस्थित होते.
दरम्यान अशोक पवार यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करत सदर रस्त्यावर तातडीने गतिरोधक तसेच दिशादर्शक व अपघातग्रस्त ठिकाणी फलक लावण्याच्या सूचना दिल्या असून सदर कुटुंबियांना शासनाच्या वतीने आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे देखील माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले.