तळेगाव – मावळ विधानसभा मतदारसंघाची होत असलेली निवडणूक सुनील शेळकेंची राहिलेली नसून मावळच्या विकासाची आणि कल्याणाची बनली आहे. मावळच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने निवडणूक हाती घेतली असून जनताच शेळकेंना विजयी करेल, असा विश्वास लोणावळ्यातील माजी नगरसेवक अशोक मावकर यांनी व्यक्त केला.
सोमवारी लोणावळा भागातील विविध गावांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, एसआरपी महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके यांचा दौरा झाला.
सकाळी गवळीवाडा येथील राम मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोणावळा शहराध्यक्ष जीवन गायकवाड, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विलास बढेकर, कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव नारायण आंबेकर तसेच दत्तात्रय गवळी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ तसेच यशवंत पायगुडे, नितीन शहा, किरण गायकवाड, अशोक मावकर, भरत हरपुडे, आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, सुजाता जाधव, पुष्पा भोकसे, सुवर्णा अकोलकर, श्वेता वर्तक आदी उपस्थित होते.
इंदिरानगर, तुंगार्ली, पांगळोली, वलवण, नांगरवाल, आगवाली चाळ या भागात शेळके यांचा प्रचार दौरा झाला. तुंगार्ली येथे मतदारांशी बोलताना अशोक मावकर यांनी शेळके यांना शुभेच्छा देत सर्व मतदार त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी पदयात्रेत मंगेश मावकर, सुनील अंभुरे, बाजीराव मावकर, आकाश कुटे, एकनाथ मावकर, नामदेव अंभुरे, सुरेश खिल्लरे तसेच शिवदुर्ग रेस्कू टीम, गणेश मित्र मंडळ, गार्डन बॉइज, विघ्नहर्ता मित्र मंडळ, गणराज मित्रमंडळ, हिंदुत्व अष्टविनायक मित्र मंडळ, साई सेवा बचत गट, कुलस्वामिनी महिला मंचचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पांगळोलीत बापूलाल तारे, दत्ता मालपोटे, किरण शेटे, हरीलाल अंभुरे, सचिन बोके, अनिकेत जाणिरे, नंदू कांबळे, अनिल कोंढभर, सूरज खांडेभरड आदींनी शेळके यांचे स्वागत केले.
वलवण येथे पदयात्रेत माजी नगराध्यक्ष श्यामराव पाळेकर, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर तसेच माधव पाळेकर, कमुशेठ जगधनवाला, उमेश तारे, सनी पाळेकर, शेखर खिल्लारे, विद्या तारे, हर्षल क्षीरसागर, अमोल गायकवाड, उल्लास पाळेकर, किशोर गायकवाड, अनिल पानसरे, सचिन तारे, मनीष पाळेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी
झाले होते.
सुनील शेळके यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा पाठिंबा
मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके यांना बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे. पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजीवन कांबळे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. यामुळे शेळकेंची ताकद वाढली असून त्यांची विजयाकडे वाटचाल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ही पुरोगामी लोकशाही आघाडीत सहभागी आहे. सुनिल शेळके हेच बहुजन समाजातील सर्व समस्या सोडवू शकतील, असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला.