‘मावळ’च्या निवडणूक निरीक्षकपदी अशोक कुमार सिंग

पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अशोक कुमार सिंग यांची सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. त्यातील मावळ लोकसभा मतदार संघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी अशोक कुमार सिंग यांची सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे.

पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस (हरित इमारत) कक्ष क्रमांक ए-104 येथे त्यांचे वास्तव्य असणार आहे. 020-26338033/26114949 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. सिंग यांचा मोबाईल क्रमांक 8275969505 आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच मावळ लोकसभा मतदार संघाचे समन्वयक अजय पवार यांनी प्रसिद्धपत्राद्वारे कळविले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.