Eknath Shinde : नाशिक येथील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण राज्यात चर्चेत आहे. खरातच्या घृणास्पद कृत्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. त्याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता राज्य शासनाने एसआयटी या विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकाच्या प्रमुख म्हणून पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्याने खळबळजनक विधान केले आहे. एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीचा मार्ग अशोक खरात यानेच दाखवला होता, असे खळबळजनक विधान शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता विनायक राऊत यांनी केलेल्या दाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणारे याकडे लक्ष असणार आहे. अशोक खरातसमेवत रुपाली चाकणकर यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्या अडचणी सापडल्या. परिणामी त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. यातच अनेक राजकीय नेत्यांचे फोटोही अशोक खरात सोबत व्हायरल होत आहेत. शिवसेना (शिंदे) पक्षाचे मंत्री दीपक केसरकर यांचा देखील अशोक खरातसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यांचीही एसआयटी चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे. हेही वाचा : Mulshi Water : पुणेकरांना आता मुबलक पाणी? मुळशीचे पाणी देण्यास सरकार अनुकूल नेमकं काय म्हणाले विनायक राऊत? माजी मंत्री दीपक केसरकर यांची एसआयटी चौकशी व्हायला पाहिजे. तसेच खरात यांच्याकडे जाणारी वाट दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांना दाखवली आणि खरात याने शिंदेना गुवाहाटीची वाट दाखवली. खरात जेव्हा तोंड उघडेल तेव्हा मंत्री मंडळातले अर्धे मंत्री उघडे पडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी आणि कलंकित नेत्यांची चौकशी करून त्याना काढून टाकावे. कोणत्याही दबावाला बळी न पडता खरात याची चौकशी सुरु ठेवावी. अशोक खरातचा घात करण्याची शक्यता नाकारता येत नाही अशोक खरात याला अटक केल्यानंतर त्याचे काळेकारनामे उघड होत आहेत. हे प्रकरण आता एसआटीकडे गेले असून, काल अशोक खरातची तब्बल सात तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनेक राजकीय नेत्यांचा वरदहस्त खरातवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर भाष्य करताना विनायक राऊत यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले, खरात यांच्या व्हिडीओची पूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांचा घात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यात ज्या ज्या नेत्यांची नावे येतील त्यांच्याकडून खरात यांचा घात हाऊ शकतो. त्यांच्या जीवाचे रक्षण करणे हे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्तव्य आहे, असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे. हेही वाचा : Accidents : ओल्या कचऱ्याच्या लिचेटने अपघात वाढले; कचऱ्याचे पाणी रस्त्यावर पडल्याने वाहनचालकांची कसरत