Ashok Kharat Case : सातत्याने शेतकऱ्यांच्या मुद्यांवर राज्य शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडणारे माजी मंत्री बच्चू कडू यांची भाजपसोबत पुन्हा जवळीक वाढताना दिसत आहे. बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखालील अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य सरकारने (Ashok Kharat Case) शेतकरी बांधवांसाठी घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाबाबत आभार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी बँकेच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची पार्श्वभूमी बच्चू कडू हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप-शिवसेना युतीत होते. मात्र लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्याने कडू यांनी काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा दिला. त्यानंतर नवनीत राणा यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत मात्र भाजप आणि नवनीत राणा यांनी संपूर्ण ताकद लावून अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू यांचा पराभव केला. मागील दोन वर्षांपासून कडू हे भाजप आणि राज्य सरकारवर सातत्याने टीका करत होते. शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवर ते आक्रमकपणे शासनविरोधी भूमिका मांडत राहिले. Ashok Kharat Case नुकत्याच राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर बच्चू कडू यांनी समाधान व्यक्त केले होते. आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. “बच्चू कडू यांची भाजपशी पुन्हा जवळीक वाढत आहे का?” असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भोंदू बाबा अशोक खरातची भविष्यवाणी व्हायरल दुसऱ्या बाजूला, काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांचा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat Case) यांच्याशी संबंधित एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत खरात कडू यांना “तुम्ही भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथे या” असा आशीर्वाद देताना दिसत आहेत. आता कडू यांची भाजपशी वाढती जवळीक पाहता, “खरातची भविष्यवाणी खरी ठरणार का?” अशी चर्चा रंगली आहे. बँकेकडून भूमिका स्पष्ट अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी कार्यक्रमापूर्वी स्पष्ट केले होते की, “पालकमंत्र्यांच्या या भेटीमागे कुठलाही राजकीय हेतू किंवा राजकारण नाही. पालकमंत्री हे कुठल्याही एका पक्षाचे नसतात, तर संपूर्ण जिल्ह्याचे पालकत्व त्यांच्याकडे असते.” ते पुढे म्हणाले, “या भेटीदरम्यान आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच शेतकरी सभासदांच्या समस्या त्यांच्या समोर ठेवणार आहोत. बँकेच्या कारभारात काही उणीवा असतील तर त्या आम्ही स्वीकारणार आहोत. जिल्ह्यातील खासदारांसह सर्व आमदारांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.” बच्चू कडू यांच्या या हालचालींमुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण चर्चेला लागले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यांवर आक्रमक असलेले कडू आता कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारचे आभार मानत असल्याने त्यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत (Ashok Kharat Case) उत्सुकता निर्माण झाली आहे.