पुणे – सिंहगड रस्ता परिसर ज्येष्ठ नागरिक कॅरम क्लबने आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम लढतीत अशोक केदारी यांनी विजेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात कासम शेख यांचा 25-23, 25-22 असा पराभव केला.
तब्बल शंभरपेक्षा जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. उपांत्य फेरीत केदारी यांनी प्रकाश यादव यांचा 25-20, 25-22 असा पराभव केला होता. तृतीय क्रमांकाच्या सामन्यात प्रकाश यादव यांनी दिलीप रानडे यांच्यावर 25-23, 25-24 असा विजय प्राप्त केला. स्पर्धेत एकमेक ब्रेक टू फिनिश केदारी यांनीच केला.
करोनाबाबतचे सर्व नियम पाळून ही स्पर्धा घेतली गेली होती. अंतिम लढत तब्बल तीन तासांपेक्षाही जास्त वेळ रंगली होती. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक भवरलाल मेहता यांच्या हस्ते करण्यात आले.