पुणे – कामगार दिनानिमित्त सिंहगड रस्ता ज्येष्ठ नागरिक कॅरम क्लबने आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेत अशोक केदारी यांनी विजेतेपद मिळवले. अटीतटीच्या अंतिम लढतीत केदारी यांनी राजाराम केळकर यांचा 25-20, 25-22 असा पराभव केला.
हा सामना तब्बल अडीच तास चालला. या स्पर्धेत तब्बल 105 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. केदारी यांनी उपांत्य फेरीत अनिल शेलार यांच्यावर 25-15, 25-23 अशी मात केली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात अनिल शेलार यांनी दीपक देशपांडे यांचा 25-21, 24-24 असा पराभव केला.
या स्पर्धेत एकमेक ब्रेक टू फिनिश कोदारी यांनीच केला तर ब्लॅक टू फिनिश प्रकाश पवार यांनी केला. पुरस्कारांचे वितरण बांधकाम व्यावसायीक सतीश प्रभुदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले.