नवी दिल्ली – आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मंगळवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेसने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची गुजरातसाठी वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचवेळी काँग्रेसचे दिग्गज नेते सचिन पायलट यांना हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी निरीक्षक बनवण्यात आले आहे. या संदर्भात पक्षाच्या वतीने केसी वेणुगोपाल यांनी निवेदन जारी केले आहे.
तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे. यासोबतच गुजरात निवडणुकीसाठी टीएस सिंग देव आणि मिलिंद देवरा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सचिन पायलट आणि प्रताप सिंग बाजवा निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुजरात निवडणुकीसाठी गेहलोत आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी बघेल यांची वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला दोन्ही राज्यात भाजपकडून सत्ता बळकावायची आहे. त्यासाठी पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
यापूर्वी चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पंजाबमध्ये आपकडून पराभव झाला होता आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्येही निराशाजनक कामगिरी झाली होती. भाजपने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता राखली.