खोटं बोलण्यात नरेंद्र एकपट, देवेंद्र दुप्पट आणि उद्योगधंदे मात्र चौपट -अशोक चव्हाण

धुळे – खोटं बोलण्यात नरेंद्र एकपट, देवेंद्र दुप्पट आणि उद्योगधंदे मात्र चौपट अशी जोरदार टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

धुळ्यातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावरील काँग्रेसच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

देशात मोदी सरकार आणि राज्यात फडणवीस सरकार यांनी पाच वर्षात केवळ घोषणांचा पाऊस केला, ‘भाजप सरकार, घोषणा दमदार’ अशी टीका त्यांनी भाजपवर केली. सरकारने पाच वर्षे केवळ घोषणाच केल्याने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये त्यांना पराभव पहावा लागला, अस म्हणत अशोक चव्हाण यांनी कवितेव्दारे नरेंद्र मोदीं याच्यांवर टीका केली.

रमन गए, रानी गयी और चले गए मामा,
अब बस दो महीने में बंद हो जायेगा चाय वाले का ड्रामा! –

 

Leave A Reply

Your email address will not be published.