अॅश्ले बार्टी ठरली ‘डब्ल्यूटीए प्लेयर आॅफ द ईयर’

लाॅस एंजल्स : आॅस्ट्रेलियाची टेनिसपटू अॅश्ले बार्टी हिला ‘डब्ल्यूटीए’ च्या मोसमातील सर्वोत्तम टेनिसपटू या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. तिला ८२ टक्के मते मिळाली. २०१९ च्या आंतरराष्ट्रीय टेनिस मोसमात तिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद तर पटकावलेच पण त्याबरोबरच चार डब्ल्यूटीए ट्राफी सुध्दा जिंकल्या आहेत.

मागील ४३ वर्षात जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थान पटकवाणारी ती पहिली आॅस्ट्रेलियन महिला टेनिसपटू आहे. १९७६ साली आॅस्ट्रेलियाच्या इवोने गालागोंग कावले हीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं होते. बार्टीने यंदाच्या वर्षी १५ स्पर्धेत ५७ लढती जिंकल्या आहेत.

बार्टीचे प्रशिक्षक क्रेग टिजर यांना डब्ल्यूटीए कोच आॅफ द ईयर हा पुरस्कार मिळाला आहे. तर १९ वर्षीय बिंयाका हिची ‘न्यूकमर आॅफ द ईयर’ या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.