जागतिक टेनिस क्रमवारीत ऍशलीघ बार्टीला अग्रस्थान

पॅरिस – ऑस्ट्रेलियाच्या ऍशलीघ बार्टीने जागतिक टेनिस क्रमवारीत अग्रस्थान घेतले आहे. तिने यंदा फ्रेंच खुल्या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले होते. तिचे 6 हजार 605 गुण झाले आहेत.

जपानच्या नाओमी ओसाकाने द्वितीय स्थान घेताना 6 हजार 257 गुण मिळविले आहेत. चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवाने तिसरे स्थान घेताना 6 हजार 55 गुणांची नोंद केली आहे. यंदा विम्बल्डन स्पर्धेत विजेतेपदाचे स्वप्न साकार करण्याऱ्या सिमोना हॅलेपने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. तिचे 5 हजार 933 गुण झाले आहेत.

नेदरलॅंडसची युवा खेळाडू किकी बर्टन्सने 5 हजार 130 गुणांसह पाचवे स्थान मिळविले आहे. पेत्रा क्विटोव्हा (चेक प्रजासत्ताक), एलिना स्वितोलिना (युक्रेन) व स्लोएनी स्टीफन्स (अमेरिका) यांनी अनुक्रमे 6 ते 8 क्रमांक घेतले आहेत. अनेक ग्रॅंड स्लॅम जिंकणारी 37 वर्षीय खेळाडू सेरेना विल्यम्स हिला नववे स्थान मिळाले आहेत. बेलारूसची आर्यना सॅबेलेन्काला दहावा क्रमांक मिळाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.