आश्‍लेषा माळवे यांना नॅशनल ऍवॉर्ड

मंचर-घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील आश्‍लेषा माळवे यांना नुकतेच नॅशनल एज्युकेशनल एक्‍सलन्स ऍवॉर्डने पुणे येथे सन्मानित करण्यात आले आहे. घोडेगाव येथील जनता विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भगवान धोंडिबा माळवे यांची आश्‍लेषा हि कन्या आहे.
पुणे येथील लाईफ स्टार ग्लोबल वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने हा ऍवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे.

सदर संस्था शैक्षणिक, सांस्कृतिक, संगीत, साहित्य, नृत्य, गायन आदी क्षेत्रात कार्यरत असून ज्यांनी या क्षेत्रात विशेष कामगिरी केली आहे. त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील नॅशनल एज्युकेशनल एक्‍सलन्स ऍवॉर्ड दिला जातो. बार्टीचे आयएएस अधिकारी महावीर जैन, संचालक अनिल कणसे यांच्या हस्ते आश्‍लेषा माळवे हिला ऍवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे.आश्‍लेषा माळवे यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.