मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. आज भल्या पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांच्या घऱी छापा टाकला होता. यानंतर नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदार श्री. आशीष शेलार यांची पत्रकार परिषद. https://t.co/QE8cA9FR6K
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 23, 2022
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँण्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली ”यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचं हे उदाहरण आहे. अशी असून टीका केली आहे. त्यांचा या टीकेवर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी भारतीय जनता पक्षातर्फे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून शेलार यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे.
‘पवार साहेब एवढे मोठे नेते आहे, त्यांना आम्ही काय सांगणार, पण सामान्य माणसाला कळतं, एवढ्या मोठ्या नेत्यांनी यापासून आपल्याला वाचवलं पाहिजे, एवढ्या मोठ्या प्रकरणात स्वत: ला जोडणं योग्य नाही’ असं म्हणत टोला लागावला आहे.