मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत टोकाचे वाद निर्माण झाले आहेत. त्यानंतर भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चांगलाच कलगी तुरा रंगत आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर टीका करत, राऊत यांनी अमित शहा, पंतप्रधान मोदी यांना शिवसेनेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले होते.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्यासाठी रोज एकपात्री वगनाटयाचा प्रयोग सुरू आहे. असा टोलाही शेलारांनी लगावला होता. “युतीतील जागावाटपाबाबत अमित शहा यांनी चर्चेची माहिती नरेंद्र मोदी यांना न देता त्यांना अंधारात ठेवल्याचा” आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर शेलारांनी हि टीका केली आहे.
तसेच मोदी आणि बाळासाहेबांचे एक खास नाते होते. हे नाते मोदी पंतप्रधान होण्याआधीपासूनचे होते. मात्र आता एक अदृश्य शक्ती मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू इच्छित असल्याचे म्हणत, शेलारांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधला होता.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवांपूर्वी म्हांटल होत ‘आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत’ त्याचा पुरावा.@Awhadspeaks @ShelarAshish @NCPspeaks @bjp4mumbai @BJP4Maharashtra pic.twitter.com/YVsNdR41cs
— NCP Thane (@ThaneNCP) November 18, 2019
दरम्यान शेलारांच्या या वक्तव्याबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, कदाचित आशिष शेलार एखाद्या मांत्रिकांच्या संपर्कात असतील, तंत्रमंत्र केलं असेल, त्याने सांगितलं असेल अदृश्य शक्ती येईल मात्र या गोष्टींवर आमचा विश्वास नाही, आमच्या मनात शक्ती आहे, प्रचंड बलवान आणि एकनिष्ठ अशा शक्ती असतात. स्वत:चे विचार त्याच विश्वासावर आम्ही पुढे जातो असं विधान केलं होतं.
तर आव्हाडांच्या या विधानानंतर ठाणे राष्ट्रवादीने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो पोस्ट करत आशिष शेलार मंत्रींकासोबत असल्याचा पुरावा असे म्हटले आहे. दरम्यान आशिष शेलारांचा हा फोटो कधीच आहे, आणि फोटोतील व्यक्ती मांत्रिक आहे कि नाही याबद्दल कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही.