मुंबई – वेदांताचा प्रकल्प गुजरातला गेला आणि सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष राज्यात सुरु झाला. याच प्रकल्पावरून आता भाजप नेते आशिष शेलार यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. वेदांता कंपनीकडे किती टक्के मागितले? असा थेट प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी नाव न घेता शिवसेनेला विचारला आहे,
वेदांता प्रकल्पावरून आशिष शेलार यांनी २ महत्वाचे ट्विट केले आहेत. आपल्या पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात उद्योगांना असलेल्या वीज आणि विविध सवलती आणि अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी 10% लाच द्यावी लागत होती. इतका भ्रष्टाचार बोकाळला होता, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केल्याची आठवण शेलार यांनी करून दिली.
वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प होता, मग इथे किती टक्के मागितले होते?10% नुसारच हिशेब मागितला जात होता की महापालिकेतील रेटने मागणी होत होती? सब गोलमाल है! चौकशी झाली पाहिजे… जनतेसमोर सत्य यायलाच हवे असे स्पष्ट मत आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे.
वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प होता,
मग इथे किती टक्के मागितले होते?
10% नुसारच हिशेब मागितला जात होता की महापालिकेतील रेटने मागणी होत होती?
सब गोलमाल है!
चौकशी झाली पाहिजे… जनतेसमोर सत्य यायलाच हवे!!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 17, 2022